
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधी
मारोती कदम
लोहा :-लोहा तालुक्यातील शेलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यमान सरपंच मारोती पाटील कदम यांची ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य तालुका लोहा उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे लोहा येथील सर्व मित्रमंडळींनी स्वागत केले लोहा तालुक्यातून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,लोहा येथे त्यांचा भव्य असा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला,यावेळी शेतकरी, मित्र मंडळ, व्यापारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे धावरी येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काळे सर ,सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, मस्की चे उपसरपंच भानुदास पाटील पवार,सेवानिवृत्त सैनिक मदन भाऊ काळे,पत्रकार विलास सावळे,बाबाराव पाटील चव्हाण, शिक्षक नेते शेख मुर्तुजा, शेलगाव येथील माजी उपसरपंच व व्यापारी गोपीनाथरावजी मुळे ,रंगनाथ पाटील शिंदे, परसराम पाटील कदम आदी मंडळी या सत्कार समारंभाला उपस्थित होते.