
दैनिक चालु वार्ता
मिलिंद खरात
पालघर प्रतिनिधी
पालघर :- पालघर जिल्हात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्या संदर्भात जि. प. अध्यक्षा यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. डहाणू तालुक्यातील बाडापोखरण व २९ गावे तसेच वसई तालुक्यातील अर्नाळा व ६९ गावे पाणी प्रश्नाने त्रस्त आहेत या गावामध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत २०१५ साला पासुन काम आजतागायत अपुर्ण अवस्थेत आहे, यासंदर्भात आयोजित बैठकीत स्थानिक जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच व ग्रामसेवक यांनी त्यांना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष काम पाहणार असे आश्वासन देऊन सदर योजनेचे काम असमाधानकारक असल्याने जि. प. अध्यक्षा यांनी अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात समस्या जाणून घेणार असल्याचे सांगितले व या योजने अंतर्गत असलेल्या प्रत्येक गावपाड्याला पाणी उपलब्ध करुन जी कामे अपुर्ण अवस्थेमध्ये आहेत ती तातडीने पुर्ण करुन घेणार असल्याचे प्रतिपादन केले.