
दैनिक चालु वार्ता
कंधार- लोहा विशेष प्रतिनिधी
ओंकार लव्हेकर
लोहा :-लोहा तालुक्यातील प्रसिद्ध असणारे महेश विद्यालय शेवडी बाजीराव येथील सहशिक्षक आदरणीय केशव जकवाड यांचा काल त्यांच्या शाळेच्या वतीने शिस्तप्रिय मुख्याध्यापक रमेश कुरुळेकर सर या सर्वांच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.महेश विद्यालय शेवडी बाजीराव येथील शिस्तप्रिय लोकप्रिय आदर्श शिक्षक आदरणीय केशव जकवाड सर यांचा वाढदिवस त्यांच्या शाळेच्या वतीने शाल ,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करून वाढदिवस करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून केशव जकवाड या शाळेत सहशिक्षक या पदावर असून या सर्व भागात ते गणिताचे तज्ञ व लोकप्रिय आहेत तर त्यांनी त्यांच्या भागात आपल्या शिक्षणाचा ठसा खूप चांगल्या प्रकारे उठवला आहे .अशाच शिक्षकांचा वाढदिवस शिस्तप्रिय असणारे मुख्याध्यापक रमेश कूरुळेकर सर व सर्व शिक्षक वृंद यांनी केला व त्यांना भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या त्यावेळी सर्व शाळेत या शिक्षकाच्या उत्कृष्ट कामामुळे सर्वजण आनंदीत होते. यावेळी मरशीवणे आर आर.(कुरुळेकर पाटील),हांडे सर, गाडवे सर,पवार सर,नरंगले सर, सालमोटे सर, असिफोदीन सर ,पाशां सर, सीराजखान सर,शेटे सर, लुंगारे सर,भोसीकर सर,सो.रत्नमाला भोसीकर मॅडम, जोंधळे , नरंगले,शेख दस्तगीर फुलझळके,मारोती नरंगले आदि उपस्थित होते.