
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षणाधिकारी पदाचा चार्ज स्वीकारल्याबद्दल श्री.डाॅ.युनुस पठाण यांचे सत्कार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांच्या हस्ते सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विविध समस्यांची मांडणी केली असता शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण यांनी सांगितले की शिक्षण विभागातील पेंडेन्सी कमी करून शिक्षकांची रखडलेली कामे वेळेत करण्याचे आवाहन इथून पुढे शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोर फायलींचा ढिगारा दिसणार नाही. शैक्षणिक यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरावी.शाळेत शिकणारे विद्यार्थी शिक्षणात गुणवत्ता कशी टिकवून ठेवेल यासाठी जिल्हा स्तरावरील सर्व जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा,नाविन्यपूर्ण उपक्रम व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात निश्चित उत्कृष्ट कामगिरी बजावली जाईल तसेच वेतन संदर्भात शासनाकडून यापूर्वी अनुदान प्राप्त झाले होते तरी आता विलंब होणार नाही या महिन्यात अनुदान प्राप्त नसल्यामुळे उशीर होत आहे, प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत देण्याबरोबरच विषय शिक्षकांची वेतनश्रेणी, विषय शिक्षकांची पदान्नोती या सारख्या महत्वाच्या विषयांवर हे ठोस निर्णय घेतला जाईल.
तसेच शिक्षण विस्तार अधिकारी व वरिष्ठ मुख्याध्यापक पदाची पदोन्नतीची प्रक्रिया या जानेवारी महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाईल.थकित वेतन देयके, नापरतावा जीपीएफ कर्ज प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, जीपीएफ पावती, डीसीपीएस जमा तपशील अद्यावत करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करून आढावा घेऊन ते पुर्ण करण्यात येतील.यासह उर्वरित शैक्षणिक समस्या टप्याटप्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिल.असे आवाहन नव्याने रूजू झालेले शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी प्रहार शिक्षक संघटनेस दिले.