
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी:- गोर बंजारा समाजाच्या गोरबोली (बंजारा भाषा) या भाषेला दर्जा द्या ,अशी एका पत्राद्वारे खा.प्रीतमताई मुंढे यांनी केली आहे. खा.प्रीतमताईच्या या मागणीला नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे गोर बंजारा समाजातील दहा कोटी नागरिक गोरबोली भाषा बोलतात.महाराष्ट्र बरोबरच कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा,उत्तरप्रदेश,राजस्थान,मध्यप्रदेश सह अन्य राज्यात वास्तव्यास आलेले बंजारा समाज लम्मनी ,लमानी, लंबाडी बाजीगर समाजातील नागरिक ही भाषा बोलतात.या भाषेला ऐतिहासिक महत्त्व आहे.त्यामुळे ही भाषा भविष्यातही टिकून राहणे अत्यंत अवश्यक आहे.असे असताना ही या भाषेला आतापर्यंत संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला नाही या भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे