
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
भारतात नवे वर्ष सुरू होण्यास फक्त एकच दिवस बाकी आहे. आजचा दिवस आणि मग मध्यरात्रीपासून सर्वत्र उत्साहाचं वातावरण असणार आहे. नव्या वर्षी कोणी संकल्प करून, कोणी थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन तर कोणी जल्लोषात पार्टी करून नूतन वर्षाचे स्वागत करतो.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काउंटडाऊन आता सर्वत्र सुरू झाला आहे. यातच आता तळीरामांसाठी एक खास बातमी आहे ती म्हणजे की येत्या नवीन वर्षात ड्राय-डे कधी आहेत याबद्दल माहीती आम्ही देणार आहोत. त्यानुसार तुम्हाला आधीच आपले नियोजन करता येऊ शकते. जाणून घ्या ड्राय-डे ची संपूर्ण यादी..
आगामी नव्या वर्षात ड्राय-डे कोणत्या तारखेला..?
1) जानेवारी-2022
14 जानेवारी : मकर संक्रांती – शनिवार
26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन – गुरुवार
30 जानेवारी : महात्मा गांधी पुण्यतिथी, शहीद दिवस – रविवार
2) फेब्रुवारी-2022
16 फेब्रुवारी : गुरु रविदास जयंती- बुधवार
19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती – शनिवार
26 फेब्रुवारी : स्वामी दयानंद सरस्वती जयंती – शनिवार
3) मार्च-2022
1 मार्च : महाशिवरात्री – मंगळवार
18 मार्च : होळी – शुक्रवार
4) एप्रिल-2022
10 एप्रिल : राम नवमी – रविवार
14 एप्रिल : डॉ.आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती – गुरुवार
15 एप्रिल : गुड फ्रायडे – शुक्रवार
5) मे-2022
1 मे : महाराष्ट्र दिन – शनिवार
3 मे : ईद – मंगळवार
6) जुलै-2022
10 जुलै : आषाढी एकादशी, बकरी ईद – रविवार
13 जुलै : गुरुपौर्णिमा – बुधवार
7) ऑगस्ट-2022
8 ऑगस्ट : मोहरम – सोमवार
15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन – सोमवार
19 ऑगस्ट : जन्माष्टमी – शुक्रवार
31 ऑगस्ट : गणेश चतुर्थी – बुधवार
8) सप्टेंबर-2022
9 सप्टेंबर : गणेश विसर्जन – शुक्रवार
9) ऑक्टोबर-2022
2 ऑक्टोबर : गांधी जयंती – रविवार
5 ऑक्टोबर : दसरा – बुधवार
8 ऑक्टोबर : दारूबंदी सप्ताह (महाराष्ट्र) – शनिवार
9 ऑक्टोबर : ईद-ए-मिलाद, महर्षि वाल्मिकी जयंती – रविवार
24 ऑक्टोबर : दिवाळी – सोमवार
10) नोव्हेंबर-2022
4 नोव्हेंबर : कार्तिकी एकादशी – शुक्रवार
8 नोव्हेंबर : गुरु नानक जयंती – मंगळवार
11) डिसेंबर-2022
25 डिसेंबर : ख्रिसमस – रविवार