
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- शहरातील क्रांतीचौक आरोग्य केंद्र , एमआयटी हॉस्पिटल , राजनगर आरोग्य केंद्र यासह आणखी तीन ठिकाणी ही लस दिली जाईल . तसेच तीन ग्रामीण रुग्णालये आणि पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह दहा ठिकाणी लस दिली जाईल . तसेच लसीचा दुसरा ङोस घेतल्यानंतर ९ महिने अथवा ३९ आठवङे झालेल्या जेष्ठ नागरिकांना तथा कोरोना योद्धांना तिसरा ङोस दिला जाईल , अशी माहिती नोडल ऑफिसर महेश लड्डा यांनी दिली .
१८ ते १५ वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण येत्या नवीन वर्षात ३ जानेवारी पासून करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे . त्यासाठी १ जानेवारी पासून कोवीन अॅपवर बालकांना लसीसाठी नोंदणी करता येईल .
औरंगाबाद जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे चार लाखांपेक्षा अधिक बालके असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने जाहीर केलाय . माञ अंतिम आकङेवारीनुसार या निकषात बसणारी फक्त २ लाख १३ हजार ८२३ बालके असल्याचे समोर आले . सुरवातीला त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था केली जाईल .तसेच ६० वर्षे व त्या पेक्षा अधिक वय असणाऱ्या तसेच कोरोना योद्धांना १० जानेवारी पासून तिसरा ङोस ( बुस्टर ङोस ) देण्यात येईल यासाठी पाञ लाभार्थीचे लसीचा दुसरा ङोस घेतल्यानंतर ९ महिने अथवा ३९ आठवङे झालेल्या जेष्ठ नागरिकांना तथा कोरोना योद्धांना तिसरा ङोस दिला जाईल .