
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व
प्रतिनिधी मोहन आखाडे
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गुरुवारी सुमारे 5,368 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने सरकारची चिंता वाढली आहे.तर दुसरीकडे ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या देखील 450 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईसह राज्यात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्धव सरकारने रात्री उशिरा कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचा सुधारित आदेश जारी केला आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवीन निर्बंध लागू होतील,
महाराष्ट्रातील नवीन बंधने जाणून घ्या
1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू
5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.
गर्दी टाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन.
31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केलं.