
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर:- काल दिनांक 30/ 12/ 2021 रोजी
केसराळी गावी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या शेतीच्या नुकसानीची पहाणी आमदार जितेशभाऊ अंतापुरकर व नायब तहसीलदार चव्हाण साहेब, कृषी अधिकारी, कृषी सहायक,तलाठी आदी अधीकार्यासह पाहणी केली, व गावातील सरपंच राजू मंनधरणे उपसरपंच मारोती मादाळे सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच दत्तू पाटील माडे गावचे प्रतिष्ठित नागरिक सुरेश रावजी शिंदे, दीपक शिंदे ,बाळू शिंदे, प्रशांत काळे डॉक्टर फारुख इनामदार, इब्राहिम शेख ,पोलीस पाटील सायलू इत्यादी गावकरी पाहणीस उपस्थित होते तसेच आमदार साहेबानी पंचनामे करून नुसकान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सुचना केली…