
दैनिक चालु वार्ता
मोलगी प्रतिनिधी
रविंद्र पाडवी
संदर्भ.1 महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक पेसा 2020/सीआर 57-8/पारा-2 दि.26/04/2021 डायरेक्ट RTGS प्रणालीचा माध्यमातून प्राप्त निधी नुसार
संदर्भ.2 महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक पेसा 2020/प्र .क्र.57-8/पारा-2 दि.29/01/2021 डायरेक्ट RTGS प्रणालीचा माध्यमातून प्राप्त निधी नुसार
संदर्भ .3 महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक पेसा 2019/प्र.क्र.74 पारा-2 दि.14/07/2020डायरेक्ट RTGS प्रणालीचा माध्यमातून प्राप्त निधी नुसार
संदर्भ .4 महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक पेसा 2018/प्र.क्र.380/8/का.17पारा-2 दि.31/05/2019डायरेक्ट RTGS प्रणालीचा माध्यमातून प्राप्त निधी नुसार
संदर्भ.5 महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक पेसा 2020/सीआर 57-8/पारा-2 दि.15/03/2021 डायरेक्ट RTGS प्रणालीचा माध्यमातून प्राप्त निधी नुसार
अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येत आहे की, संदर्भ १ ते ५ अन्वये काठी ग्रामपंचायतला दरवर्षी प्रमाणे आदिवासी उपाययोजना करीता पाच टक्के निधी शासनाने उपलब्ध करुन देण्यात आलेला असल्याचे दिसून येत आहे. काठी ग्रामपंचायत ला रुपये ३६०५७३१ छत्तीस लाख पाच हजार सातशे एकत्तीस रुपये इतका निधी ग्रामपंचायत काठी ला शासनाने उपलब्ध करुन देण्यात आलेला आहेत. शासनाने पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. यासाठी ग्रामसभा कोषाचे स्वतंत्र बँक खाते आहे. सरकारकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभाकोषाच्या खात्यावर निधी थेट बँकेमार्फत वितरित करण्यात येत असतो.यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच निधी जमा होत असल्यामुळे वर्षभरात तो गावाच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वापरता येत असतो.
ग्रामपंचायती अंतर्गत असलेली गावे, पाडे व वाड्या यांच्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी वापरावयाचा आहे. त्यामुळे सर्वांना समान लाभ मिळून विकासापासून कुणीही वंचित राहणार नाही. उपलब्ध निधीपैकी प्रत्येकी 5 निधी या प्रमाणात खर्च करण्यात नमूद असताना काठी ग्रामपंचायतींमध्ये निधी चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात येत असून ग्रामसेवक श्री.बिऱ्हाडे हे अक्कलकुवा येथूनच काम पाहात असून ग्रामपंचायतमधील पेसा योजनेच्या निधीतून विविध कामे कागदोपत्री व नियमबाह्य करण्यात आल्याचे दिसत आहे.
पेसा निधी व योजनेची कोणतीही माहिती आढावा तालुकास्तरावर घेत नसल्यामुळे अनेक ग्रामसेवक यांनी हा निधी चुकीच्या पद्धतीने खर्च केला. त्यामुळे आदिवासी गावात खऱ्या अर्थाने या योजनेची अंमलबजावणी व जनजागृती होताना दिसत नाही.व ग्रामपंचायत मधील अनेक ग्रामपंचायत सदस्यांना अद्याप कोणतेही माहिती देण्यात येत नाही व प्रशिक्षण देण्यात आले नाही.गटविकास अधिकाऱ्यांनी मात्र अद्यापही पेसा ग्रामपंचायतला भेटी दिल्या नाही. मासिक बैठकीतही पेसा ग्रामपंचायत निधी खर्चाबाबत आढावा घेताना दिसत नाही. त्यामुळे काठी ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकांना पेसा कायदाचा विसरच पडला, अशी नागरिकांत चर्चा सुरू आहे. व प्रत्येक ग्रामपंचायत झालेल्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
सदरचा निधी संबधित ग्रामसभेने त्या अंतर्गत येणाऱ्या गाव वस्ती वाडी पाडा यांच्या आदिवासी लोकसंख्येचा प्रमाणात खर्च करावा असे शासन निर्णय मध्ये तरतूद केलेली आहेत त्यानुसार आपण आपले स्तरावरुन सदर निधीचा विनियोग कोणत्या पध्दतीने आणि कोणत्या कामासाठी खर्च केला आहेत तसेच खर्च करतांना ग्रामसभेला विचारले होते का किंवा कसे प्रोसेडिंग वर किती ग्रामस्थांनी सह्या केल्या होत्या का? किती ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य किती उपस्थित होते? किती खर्च झाले किती बाकी आहेत? शासनाने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीचे उपयोगीता प्रमाणपत्र व बाबनिहाय खर्चाची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत.
काठी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.बिऱ्हाडे यांनी बेकायदेशीर हस्तक्षेप वा न्यायिक चौकटीच्या बाहेरची असून केवळ त्यांच्या अति अहंम तथा अहंकार दर्शविणारे होते व आहे.तथापि सदर ग्रामसेवकांनी कोणत्याही स्वरुपात सनदशीररित्या ग्रामसेवकांचे कार्य पार न पाडता केवळ गैरलाभास्तव हस्तक्षेप केल्याचे देखील आम्हा गावकऱ्यांना कळाले आहे. ग्रामसेवक म्हणून कार्य पार पाडीत असतांना सर्व सामान्य जनतेला कामी लेखण्याकरिता सदरहु ग्रामसेवकांनी स्वताच्या असद हेतूस्तव अहंम भावातून, घमंडी स्वभावातून तथा अहंकारातून सर्वसामान्य जनतेला व तक्रारदाराला कमी लेखण्याचा प्रयत्न केलेल्या त्यांच्या बोलीचालीतून दिसून येत आहे. सदरहु ग्रामसेवकांचे अविर्भाव वा अहंकार ज्यातून निश्चितपणे गावाचा विकास व न्यायिक प्रतिमा मलीन झालेली आहे. करिता आपण सदरहु ग्रामसेवकांचे आपण वरिष्ठ सक्षम अधिकारी असल्याने उचित कार्यवाही करिता प्रत रवाना करीत आहे.
प्रत माहितीस्तव व उचित कार्यवाही प्रत रवाना
१) मा.ना.श्री. उद्धवजी ठाकरे,मुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य ,मुंबई
२) मा.ना.श्री.दिलीप – वळसे पाटील सो.गृहमंत्री ,महाराष्ट्र राज्य ,मुंबई
३)मा.ना.श्री.ॲड.के.सी.पाडवी सो.आदिवासी विकास मंत्री , महाराष्ट्र राज्य ,मुंबई
४)मा.ना.श्री.हनीफ मुश्रीम सो.ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य ,मुंबई
५) मा.अप्पर मुख्य सचिव,ग्रामविकास व पंचायत राज विभाग,बांधकाम विभाग,मुंबई
६)मा.पोलीस महासंचालक सो . महाराष्ट्र राज्य ,मुंबई
७)मा.आयुक्त सो.आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य ,नाशिक
८) मा.आयुक्त सो. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे
९) मा. पोलीस महानिरीक्षक सो.नाशिक परिक्षेत्र,नाशिक.
१०) मा.विभागीय आयुक्त सो, नाशिक
११) मा. जिल्हाधिकारी सो,नंदुरबार
१२) मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो.जिल्हा परिषद, नंदुरबार
१३) मा.प्रकल्प अधिकारी सो.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा
१४) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. अक्कलकुवा
१५) मा.पोलीस निरीक्षक सो.अक्कलकुवा…..