
दैनिक चालु वार्ता
अतनूर प्रतिनिधी
ग्राहकांच्या हितासाठी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन दरवर्षी साजरा केला जात असून ग्राहकांनी सदोष वस्तु व दर्जेदार सेवा मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकारासाठी लढा देऊन, जागरूक राहून आपले हक्क कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे. ग्राहक म्हणून प्रत्येक जण वस्तू, साहित्य किंवा सेवा विकत घेत असतो. गुणवत्तापूर्ण निर्धारित किंमत व पॅकिंग योग्य आहे वापरावर मर्यादा कालावधी योग्य आहे. वापर मर्यादा कालावधी योग्य आहे, याची खात्री करूनच वस्तू खरेदी केली जावी. त्यासाठी असलेले मुल्य त्यांची योग्य ती पावती घेतल्याशिवाय दिले जाऊ नये असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य औरंगाबाद विभाग अध्यक्ष सतीश माने मदनसुरीकर यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनी दि.२४ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर रोजी वार शुक्रवार अतनुर ता.जळकोट येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर-अतनूर, साधुराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, वसुंधरा महिला मंडळ, जयहिंद किडा व व्यायामशाळा अतनूर या सेवाभावी ग्राहक चळवळ कार्यरत संस्थेच्या वतीने दि.२४ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ रोजी चालणाऱ्या ग्राहक जनजागृती व जाणीव जागृती सप्ताहाच्या जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटक व आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य औरंगाबाद विभाग अध्यक्ष सतीश माने व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर मार्गदर्शन करताना सध्या काळात प्रत्येक ग्राहकाने वस्तू खरेदी करताना वस्तूची गुणवत्ता, किंमत व पॅकिंग तपासून घेण्याबरोबर त्या वस्तूंची पावती घेणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी याच उद्देशाने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो असे सांगितले. कार्यक्रमासाठी विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य व्ही.एस.कणसे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा संघटक तथा ग्राहक जनजागरण कार्यकर्ता बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जिजामाता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कसबे, शिक्षक तथा पत्रकार संग्राम पवार, पत्रकार संजय शिंदे, विवेक खरे, शरद सुर्यवंशी, अँड.नवाज मुंजेवार, अँड.सचिन सासट्टे, सौ.संध्या शिंदे, सौ.रुक्मिणी सोमवंशी, सौ.शोभा शिंदे, श्रीमती शकुंतला बाबर उपस्थित होते.
या सप्ताहात राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक चळवळ, ग्राहकांचे हक्क आणि अधिकार तसेच ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली. अतनूर परिसरातील २८ गाव,वाडी,तांडा,वस्तीत ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृतीपर येथील सर्व ग्राहक कार्यकर्त्यांनी विविध पोम्प्लेट, परिपत्रके वाचन, पत्रके वाटून, ग्राहक न्याय, ग्राहक हक्क, ग्राहक न्याय मासिक वाटप तसेच आपल्या परिसरातील शाळा, कॉलेजमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना, गावातील प्रतिष्ठान, प्रतिष्ठित नागरिकांना, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांना, ग्राहक सेवा पुरवठादार व ग्राहक कार्यकर्त्यांना याबाबत माहिती देऊन हा कार्यक्रम विशेष करण्यात आले.