
दैनिक चालु वार्ता
मोलगी प्रतिनिधी
रविंद्र पाडवी
अक्कलकुवा :-अक्कलकुवा तालुका व्यवस्थापक माकत्या दमण्या वसावे यांना तात्काळ सेवेत रुजू करण्यात येऊन त्यांच्या विरोधात खोट्या तक्रार दाखल करणाऱ्यावर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही होणेकरिता…कि,अक्कलकुवा तहसील कार्यलयात सन 2016-2021 च्या ऑक्टोबर महिन्यापर्यत निस्वार्थीपणे आपले कर्तव्य पार पाडणारे तालुका व्यवस्थापक माकत्या दमन्या वसावे यांना काही कारण नसताना त्यांना तालुका व्यवस्थापक या पदावरुन सेवा समाप्तीच्या करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दिनांक 28 /12/2021 रोजी श्री.माकत्या वसावे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन खोट्या स्वरूपाची तक्रार करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केले आहे.एकंदरीतच परिस्थिती पाहता ,त्यांच्या तक्रारी अर्जाचे अवलोकन केले असता ज्या तक्रारदाराने ऑक्टोबर महिन्यात तक्रार दाखल केली त्यांना मंजूर वनदावे मे महिन्यातच देण्यात आले आहे व तेही संबंधीत गावाचा तलाठी यांच्यामार्फत वाटप करण्यात आले आहे.म्हणजे त्या वन दावे वाटप करण्यात वसावे यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध आलेला दिसून येत नाही.असे असताना पाच वर्ष निस्वार्थी पणे आपले कर्तव्य पार पाडण्याऱ्या श्री वसावे यांना तडकाफडकीने पदावरून काढण्यात आले.
श्री. वसावे यांचा खरोखरच वन दावे वाटपात संबंध आला आहे का? संबंधित गावाचा तलाठी यांच्या मार्फत वनपट्टे वाटप करण्यात आले होते तर त्यांचा संबंध कसा आला ? या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन ज्यांनी खोटी तक्रार दाखल केल्याने श्री.वसावे यांना सदरील पदावरून काढण्यात आले आहे. त्यामुळे श्री. माकत्या वसावे यांना तात्काळ सेवेत घेण्यात यावे व खोटी तक्रार दाखल करुन त्यांना बदनामी केल्याप्रकरणी तक्रारदार यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे याची सक्त नोंद घेण्यात यावी ही विनंती असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अॅडव्होकेट गणपत पाडवी, युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष विनोद माळी, शहराध्यक्ष विनोद पाडवी आदी उपस्थित होते.