
दैनिक चालु वार्ता
मध्य – औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
संभाजीनगर :- येथील शिवसेना नेते तथा मा. खासदार चंद्रकांत खैरे याच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा ज्योतीनगर व हाळणोर अण्णा मिञ परिवार व तसेच प्रा. रिजवानी यांच्या वतीने गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले .शिवसेना शाखा ज्योतीनगर व हाळणोर अण्णा मिञ परिवारच्या वतीने नेहमी सामाजिक व समाजसेवी उपक्रम नेहमी राबविण्यात येतात.या मध्ये गरजूंना अण्णदान,कपङे वाटप,ब्लँकेट वाटप,औषधी वाटप,रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
या प्रसंगी माजी सभापती गिरजाराम हाळनोर , नगरसेविका सुमिञा हाळनोर , उपविभाग प्रमुख अविनाश कुलकर्णी , शाखाप्रमुख महेंद्र उर्फ बापू जहागीरदार , गटप्रमुख बंङू मोरे , प्रमोद जोशी , श्रीकांत दंङे , हरिपाठ मंङळाचे प्रकाश बहीरे , अच्युत देशमुख , हेमंत जोशी , पुरूषोत्तम कळमकर , महिला आघाडीच्या सपर्णा चिंतलकर , अश्विनी जहागीरदार , सत्वशीला सुपेकर , सुनीता वर्मा , मंगला घाङगे , सुरेखा जाजू व इतर सहकारी वर्ग उपस्थित होते .