
दैनिक चालु वार्ता
अरुण भोई
दौंड :- दौंड तालुक्यातील खडकी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणामध्ये योगासनाच्या विविध प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला. खडकी गावच्या युवा सरपंच स्नेहल संजय काळभोर यांच्या सहकार्याने मराठी शाळेतील विद्याथ्र्यांना योगासनांचे महत्व पटावे म्हणून राष्ट्रीय पातळीवरील योगा खेळाडू शरयू नरुटे हिला बोलाविण्यात आले होते. यावेळी शरयू नरुटे हिने विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवन निरोगी व सुखकर जगत यावे यासाठी योगासने किती महत्वाची आहे हे पटवून सांगितले. यावेळी शरयू नरुटे हिने विविध योगासनांची प्रात्यक्षिके विध्याथ्यांना करून दाखविली. त्याला उपस्थित विध्याथ्र्यांनीही चांगला प्रतिसाद
देऊन विविध योगासनांचा अनुभव घेतला.
प्रारंभी प्रार्थना होऊन त्यानंतर वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, पर्वतासन, शवासन हलासन असे उभे आसन प्रकार तसेच भद्रासन, शशांकासन, वक्रासन असे बैठे आसन प्रकारांसोबतच कपालभाती प्राणाय शांतीपाठ अशी योगसाधना यावेळी करण्या आली. या योगासन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी खडकी गावच्या युवा सरपंच कु स्नेहल काळभोर,उपसरपंच राहुल गुणवरे, माजी जि.प.सदस् संजय काळभोर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब गुणवरे व शाळेच्या मुख्याध्यापिका अमिना सय्यद यांच्या हस्ते शरयू नरुटे हिचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नव्यानेच पदवीधर शिक्षक म्हणून रुजू झालेल्या शिक्षिका स्वाती राणे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.