
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
दि.३० डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ उंदरगाव, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड जळगाव व कृषी तंत्र अग्रो एजन्सिज बार्शी तर्फे दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट राज्यस्तरीय पोपटराव माने-पाटील आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार २०२० वितरण सोहळा टेंभुर्णी तालुका माढा येथे संपन्न झाला.त्यात गत २५ वर्षांपासून निष्कलंक व निस्वार्थी पणे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात व कृषी क्षेत्रात यशोगाथा व योगदानाबद्दल व लिखाणाबद्दल संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांना कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे दैनिक सकाळचे संपादक अभय दिवाणजी, महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त पुण्याचे उमाकांत दांगट यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय कै.पोपटराव माने-पाटील आदर्श कृषी राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार २०२० पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, ट्रॉफी, शाल, पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व दैनिक सकाळ सोलापूर आवृत्तीचे संपादक अभय दिवानजी यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष अतुलनाना माने-पाटील तसेच कृषी आयुक्त पुणे उमाकांत दांगट, ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्याचे सदस्य शिवाजीराव पाटील, ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासनाचे सदस्य बाळासाहेब पठारे, कृषी पदवीधर संघटना संस्थापक अध्यक्ष महेश कडूस-पाटील, संभाजी ब्रिगेड पंढरपूर विभाग अध्यक्ष सचिन जगताप, शंभू सेना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ चव्हाण, ऊस नियोजन समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य किशनराव चव्हाण, जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेडचे स्टेट हेड शामकांत पाटील, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष तथा जलतज्ञ अनिल पाटील, महाराष्ट्र ऊस उत्पादक संघ राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, कृषी तंत्र अग्रो एजन्सिज बार्शी चे मॅनेजिंग डायरेक्टर अजित मिरगणे, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड रिजनल मॅनेजर संतोष डांगे, अध्यक्ष संतोष इंगळे, उपाध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष अतुल म्हस्के, सचिव मुकुंद आरे, सहसचिव वैभव साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती वरील मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बालासाहेब शिंदे यांना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.