
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोतीकदम
सोनखेड:- कै.दतराम गणपतराव मोरे देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प शालिनीताई निवृत्तीनाथ इंदोरीकर यांचे सुश्राव्य असे किर्तनझाले आई वडिलांची सेवा करा असा संदेश या कीर्तनातून शालिनीताई यांनी सर्व भक्तमंडळीना दिला यावेळी प्रणिता ताई यांनी शालिनी ताई यांचा सत्कारही केला. जायाचे शरीर जाईल क्षणात ,का हा गोपीनाथ पावे चि ना ,तुम्ही संत सारे कृपेचे सागर ,निरोप हा फार सांग देवा.. या अभंगावर सुश्राव्य असे किर्तन केले त्या कीर्तनातून त्यांनी समाजाला प्रबोधन करत असताना आज आपली लुप्त होत चाललेली भारतीय संस्कृती यांचे महत्त्व सांगितले मातृदेवो भव पितृ देवो भव अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण आई-वडिलांची सेवा करावी हीच आपली भारतीय संस्कृती आहे ज्या पद्धतीने सोनखेड नगरीमध्ये दतरावांची सेवा त्यांच्या मुलांनी देविदासराव,मोरे यानी केली आणि आजही ते चांगला सेवेचा वसा चालवतात असे कीर्तनातून प्रबोधन केले या किर्तनाला सोनखेड परिसरातील बरीचशी मंडळी उपस्थित होती त्यापैकी वडेपुरी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता ताई देवरे चिखलीकर ह्या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजक ॲड.देविदास मोरे डॉक्टर गजानन मोरे साहेब,अमोल देविदासराव मोरे ,यानी आभार मानले, परिसरातील ख्यातनाम कीर्तनकार भजनी मंडळी उपस्थित होते त्यामध्ये ह-भ-प गोपीनाथ महाराज मडकीकर,सुधीर महाराज पळशीकर, रंगनाथ महाराज मडकीकर, सदाशिव शाहीर पळशीकर,प्रमोद महाराज,शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर,अनिल मोरे,व बरीचशी गुणीजन गायक,भजनी मंडळी या किर्तनाला उपस्थित होते प्रणिता ताई साहेबांनी हे कीर्तन ऐकले व येथील सर्व मंडळींनी कीर्तन झाल्यानंतर पुण्यतिथीचा प्रसादाचा लाभ घेतला शालिनीताई यांनी या कीर्तनातून भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि आई-वडिलांची सेवा करा असा संदेश युवक मंडळींना दिलेला आहे.