
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी नांदेड दक्षिण
बालाजी पाटील गायकवाड
महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने दिनांक 3 जानेवारी 2022 पासुन सावित्री जयंती या दिवसापासून ते 12 जानेवारी 2022 जिजाऊ जिजामाता जयंती पर्यंत महाराष्ट्रातील सर्व मुलींचा सन्मान झाला पाहिजे. या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्याचे अवलंबिले आहे. प्रत्येक शाळेमध्ये दिनांक 3 जानेवारीला सावित्री बाई फुले यांची जयंती व त्यानिमित्ताने सावित्रीबाईंची विचार अंगीकृत करावे यासाठी त्यांचे आचार आपण अवलंबिले पाहिजे.दिनांक 4 जानेवारी रोजी आरोग्याची माहिती व उद्बोधन शिबीर निबंध लेखन चित्रकला स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये झाले पाहिजे आणि आजच्या समाजातील मुलीच्या निर्भिड बनला पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन या सप्ताहाच्या माध्यमातून शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेतील उपक्रमशील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन शिक्षणाधिकारी व शिक्षण विभाग करत आहे.