
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
किरण गोंड
कुणकी :-आजादी का अमृत महोत्सव निमित्त आज जिल्हा परिषद शाळा कुणकी येथे बाल सभा घेण्यात आली. बाल सभेचा विषय होता वृक्षारोपण काळाची गरज यावेळी बाल सभेचे अध्यक्ष इयत्ता वर्ग सातवी ची विद्यार्थिनी कुमारी प्रीती गंगोत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून सृष्टी केंद्रे व दिव्या पवार या होत्या. बाल सभेचे सूत्रसंचालन व आभार कुमारी माहेश्वरी कांबळे यांनी मानले. हा आगळा वेगळा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक अर्जुन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.