
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे जीएसटी परिषदेची 46वी बैठक झाली. जीएसटी परिषदेच्या 45व्या बैठकीत घेण्यात आलेला, वस्त्रोद्योग क्षेत्रातील जीएसटी दरात बदल करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची शिफारस जीएसटी परिषदेने केली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात सध्या लागू असलेले जीएसटी दर एक जानेवारी 2022 नंतर पुढे सुरू राहणार आहेत.