
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
गोकुळवाडी :-विठू माऊली प्रतिष्ठान व ग्रामस्थ गोकुळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.वाडकर प्रा.बदने व इतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी तसेच मातृभूमी गोकुळवाडी येथे अधिकारी व कर्मचारी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.गोकुळवाडी हे गाव एक छोटीशी वस्ती असून या छोट्याशा गावातून अधिकारी कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी घडले. हभप धर्मभूषण वटेमोड महाराज राष्ट्रपती पुरस्कृत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी येथे भव्य मंदिर स्थापना करण्यात आली गावांमध्ये सर्व भाविक राहत असून अशा पावन भूमीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त्य विठू माऊली प्रतिष्ठान व ग्रामस्थ गोकुळवाडी संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थी यांचे रूपांतर अधिकारी व कर्मचाऱ्यां मध्ये होऊन त्यांनी कर्तव्याचे ठिकाणी आपले कर्तव्य निष्ठेने कार्य बजावून गावाचे नाव लौकिक करीत आहेत.
अशा गुणवंताचा सत्कार प्रा. बदने प्रा. डॉ. धोंडराम सर प्रा. सूर्यवंशी सर यांनी केला त्या गुणवंता मध्ये प्राध्यापक विठ्ठल बरसमवाड यांनी अहमदनगर येथे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यापासून गुणवंत विद्यार्थी तयार केले तसेच त्यांनी दररोज कोणत्यातरी विषयावर एक लेख लिहून पंचरत्न आणि क्रांती रत्ने ही पुस्तके लिहून त्यांनी आपल्या लेखणीतून कर्तव्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केले विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री वाडीकर यु एम यांनी आपले कर्तव्य निष्ठेने कार्य करून न्यायदानासाठी सहकार्य करीत आहेत श्री ज्ञानेश्वर शिरबरतळ यांनी समाजकल्याण विभागात नियुक्ती झाल्यापासून सामाजिक बांधिलकी जपून समाजासाठी कर्तव्य निष्ठेने कर्तव्य बजावून जनतेसाठी व विद्यार्थ्यासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत श्री शामराव शिरबरतळ अपंग आयटीआय मध्ये प्राध्यापक असून त्यांनी अपंग विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी चांगल्याप्रकारे प्रशिक्षण देऊन स्वबळावर चालण्याचा मार्ग दाखविला.
पवन शिरबरतळ यांनी स्वतःचे एम एस सी आय टी कॉम्प्युटर चालवून विद्यार्थ्यांना संगणकाच्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत भानुदास शिरबरतळ यांनी व्यापारी क्षेत्रामध्ये उतरून स्वबळावर जगण्याचा मंत्र दिला विद्यार्थिनी आकांक्षा उमाकांत वाडीकर हिने दहावीला 98 टक्के मार्के घेऊन आतापर्यंत च्या काळात गावातून पहिली येण्याचा मान मिळविला प्रशांत शिरबरतळ व इतर गुणवंतांचा सत्कार या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मान्यवर मा.प्रा. डॉ. वारकड प्रा. डॉ. बदने प्रा. रत्नमाला अंकमवार, प्रा. सूर्यवंशी, ह भ प दत्तात्रय निमलवाड, नुकूलवाड मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
तसेच जेष्ठ नागरिक नरहरी शिरबरतळ सायबु शिरबरतळ यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी पत्नी सर यांनी मार्गदर्शन करताना आई- वडिलांची आई-वडिलांच्या सेवेतच सर्व काही मिळते देव देवळात जाऊन मिळत नसून तो आपल्या आई- वडिलांची सेवा केल्यास देव स्वताहून भक्तासाठी धावून येतो भक्त पुंडलिकाचे उदाहरण दिवाळी दाखवून दिले तसेच जात्यावरील ओव्या गाऊन दृष्टांत देऊन श्रोत्यांना हसवून तसेच बिकट परिस्थितीची जाणीव करून दिल्यामुळे श्रोत्यांनी डोळ्यातील अश्रू रोखू शकले नाही.
प्रा बदने सर यांनी आपल्या वाणी मध्ये प्रत्यक्ष सरस्वती मातेची कृपा असल्याचे दाखवून दिले कार्यक्रमाचे सर्व मान्यवरांनी कुमारी आकांक्षा हिचे तोंड भरून कौतुक करून आई-वडिलांच्या गावाचे नाव उज्वल करण्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा वर्षाव केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जायभाये यांनी केले आभार कल्याणी बरसमवाड यांनी मानले तर पसायदान केरबा मास्तर शिरबरतळ यांनी गायले कार्यक्रमास मोगलाजी बरसमवाड, वसंत शिरबरतळ ॲडव्होकेट नाईकवाड विनायक शिरबरतळ,प्रल्हाद बरसमवाड, बालाजी बरसमवाड, गंगाराम शिरबरतळ, वाडीकर गुरुजी, बालाजी शिरबरतळ आदी ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.