
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
लिंबीपाडा :- जि.प.शाळा लिंबीपाडा येथे नवीन वर्षानिमित्ताने शालेय वस्तू वाटप करण्यात आले.जि.प.शाळा लिंबिपाडा (मोलगी) येथे गावातील प्रतिष्ठित नागरिक खेत्या दादा वसावे यांनी सर्व विद्यार्थ्यांना नववर्षानिमित्त शालेय वस्तू व पेन शालेय साहित्य यांचे वाटप केले.याप्रसंगी त्यांनी शालेय विद्यार्थी गुणवत्ताचे व शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. माकत्या सुरज्या वसावे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. शालेय गुणवत्ता बाबत माकत्या दादा यांनी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री.नितीन लेंडवे सर यांनी केले या प्रसंगी मुख्याध्यापक पाडवी सर ,श्री.अँड.अमरसिंग वसावे,अर्जुन वसावे,आकाश वसावे,सरदारसिंग वळवी,संजय वसावे व इतर शिक्षक वर्ग गावकरी उपस्थित होते.