
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
घूग्घूस :- घुग्घुस येथील सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे व ग्रामस्थांच्या सहयोगाने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवार 31 डिसेंबर रोजी सामुदायिक ध्यान प्रार्थना मंदिर, श्रीराम वार्ड क्र. 2 घुग्घुस येथे संपन्न झाला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, गुरुदेव सेवा मंडळाचे मधुकर मालेकर, नारायण ठेंगणे, संजय भोंगळे, पुंडलिक खनके उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पहाटे 5 वाजता घटस्थापना बालाजी धोबे यांच्या हस्ते, 5:30 वाजता ध्यानपाठ, प्रबोधन पांडुरंग जुनारकर महाराज यांचे, 8 वाजता रामधून शहरातील प्रमुख मार्गाने, सकाळी 10 वाजता भजन संध्या, शहरातील भजन मंडळाचे, दुपारी 2 वाजता ह.भ.प.श्री. काशीनाथ क्षीरसागर व रमाकांत मांढरे आणि संच यांचे काल्याचे किर्तन, सायंकाळी 4:58 वाजता मौन श्रद्धांजली, सायंकाळी 5 वाजता सामुदायीक प्रार्थना प्रबोधन ग्राम गिताचार्य श्री. राजुजी भोंगळे नवेगाव असे विविध कार्यक्रम घेण्यात आले व प्रसाद वाटप करण्यात आला. आभार व समारोप कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे नीलकंठ नांदे, विठोबा बोबडे, बालाजी धोबे, पंढरी कातरकर, शांताराम पिंपळकर, शेखर तंगलपेल्ली, रंजना कामटकर, छाया मालेकर, छब्बू कातरकर, ताराबाई बोबडे, ममता श्रीवास्कर, ताराबाई देवतळे, विजया बंडेवार, संध्या जगताप, जनाबाई निमकर, अनुसया चिडे, चांदा गेडाम व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.