
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
नांदेड :-१ जानेवारी २०२२ रोज शनिवारी सकाळी ५वाजता रेल्वेस्टेशन येथे राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष माजी मंत्री मा.आमदार महादेवजी जानकर साहेब यांचे आगमन होणार असून,तेथून पुढील प्रमाणे कार्यक्रम राहातील.नांदेड रेस्ट हाऊसला ५ .३० ते ८ वाजेपर्यंत विश्रांतीसाठी , सकाळी ८ ते ९ वाजता कार्यकर्त्याशी चर्चा, ९.३० वाजता कारने पुसदकडे रवाना , दुपारी १ वाजता पुसद येथे रासपा कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करतील आणि संध्याकाळी ५ वाजता वर्धापन दिन व प्रकाशन सोहळा कार्यक्रमाला उपस्थित राहतील, नंतर परत रात्री ७ वाजता पुसद येथे रेस्ट हाऊसला मुक्काम. २ जानेवारी २०२२ रोज रविवारी ११वाजता राष्ट्रिय समाज पक्षाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता मुंबई कडे रेल्वेने रवाना होतील. सोबत राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर राहाणार आहेत.
तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व रासपाच्या जुने नवे जिल्हा, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पक्षाचे चहाते सर्व कार्यकर्त्यांनी माजी मंत्री मा.आमदार महादेवजी जानकर साहेब यांच्या स्वागतासाठी सकाळी ५वाजता रेल्वेस्टेशनवर उपस्थित राहावे.
२जानेवारी २०२२ रोज रविवारी ११वाजता रासपाच्या मैळाव्याला सर्वानी आवर्जून उपस्थित राहावे असे राष्ट्रिय समाज पक्षा तर्फे कार्यक्रम संयोजक प्रा. शिवाजीराव इंदूरे , डॉ रामराव शिरामे , अॅड. चंद्रभागाताई काळे , शांतीलाल जैन , नागनाथ प्रा.लक्ष्मण वजीरे, हणमंत पाटील,अंकुश वाघे,कोकणे रासप तालुका अध्यक्ष, उत्तम चव्हाण यांनी कळवितात.