दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
पिंपरी :- महाराष्ट्र राज्याचा आवडता खेळ म्हणजेच कब्बडी.लहण्यापासून ते मोठ्यापर्यंत कोणीही कब्बडी म्हणलं की बघण्यासाठी आणि खेळण्यासाठी उत्सुक असतात.सतत दोन ते अडीच वर्ष तर आपण कोरोना च्या जाळ्यात अडकलो होतो.सगळे घरात बसलेले आणि अशा मधेच जे कब्बडी खेळणारे संघ होते त्यांनी खूप कब्बडी ची आठवण केली असणार .पण तब्बल अडीच वर्षानंतर आता सगळ काही चालू आहे आणि त्यामधेच ग्रामीण स्तरावर कब्बडी चे सामने ठेवले जातात .
ज्यामधे खूप चांगले खेळणारे खेळाडू येतात. अशाच प्रकारे मुल तालुक्यातील भेजगाव येथे तीन दिवसीय कब्बडी सामने घेण्यात आले .दी.30,31 डिसेंबर 2021 आणि 1 जानेवारी 2022 .त्यामधे प्रथम बक्षीस 20 हजार ,द्वितीय 15 हजार ,आणि तृतीय 10 हजार अशा प्रकारे बक्षीस होती आणि ही सामने खेळण्यासाठी खूप दूरवरून खूप सारे संघ आले होते .पण म्हणतात ना की कब्बडी हा खेळामध्ये खेळाडू सर्वगुण संपन्न असायला हवं.आणि या मधेच एक पिपरी देशपांडे या गावाचा सुद्धा एक संघ होता.ज्या संघाने आजपर्यंत मेहनत करून अनेक सामने जिंकले आहेत.
भेजगावं मधे सुद्धा पिपरी देशपांडे हा संघ नवीन वर्षाला अंतिम सामन्यात पिपरी देशपांडे विरुद्ध भेजगाव असा सामना झाला यामधे खूप साऱ्या गुणांनी भेजगाव या संघाला पराभूत करून खूप साऱ्या गुणांनी पिपरी देशपांडे या संघाने विजय मिळवला आहे. खेळातील खेळाडू गौतम ताडे ,महेश महुळकर,उमेश कुळगामकर, शुभम देशमुख,आकाश व्याहाडकर,लखन आरेकर,अजय बावणे,महेश पाल,अक्षय चिंचोलकर ,तुषार पाल ,गौरव चुदरी या पूर्ण संघाचं मुल चे सभापती मा. चंदुभाऊ मारगोनवार यांनी कौतुक केलं