
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
पुढे हुतात्मा स्मारक आहे येथे गेलो येथे सुद्धा हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले हे ठिकाण देखील खूप महत्त्वाचे मानले जाते कारण हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात शहिद हुतात्म्यांच्या आठवण व प्रतिक समजले जात. हुतात्मा स्मारक हे कंधार येथील आजचे सेल्फी पॉइंट व शुद्ध मोकळी हवा घेण्या करिता कंधार येथील लोक आवर्जून येथे फिरायला येतात. प्रसन्न मोकळी हवा, निशब्द शांतता आणि निसर्गरम्य वातावरण सर्व बाजूने हिरवळ त्यामुळे सकाळी व्यायाम करण्यासाठी सायंकाळी विश्रांती घेण्यासाठी नागरिक येथे येतात.
तसेच हुतात्मा स्मारकास भेट देऊन आम्ही सर्वजण आपापल्या वाहनात बसलो. कारण पुढे खूप लोकांना भेटी द्यायच्या होत्या. रण यात्रेची सुरुवात होती. आत्तापर्यंत ची सर्व ठिकाणे कंदार शहरामध्ये जवळजवळ होती. सर्वांचे मन प्रफुल्लित होते. आम्हा विद्यार्थ्यांमध्ये तर खूप उत्सुकता होती. कारण आम्हा सर्व विद्यार्थ्यांची ही पहिलीच रणयात्रा होती. वाहने चालू झाली ठरल्याप्रमाणे ठाणे प्राध्यापक पुरुषोत्तम रावजी धोंडगे साहेब यांच्या गाडीत पाठोपाठ सर्व वाहने लोहा शहराच्या दिशेने निघाली.
रस्त्याच्या दुतर्फा डोंगर रांगा आणि डोंगररांगेतील हिरवळ मनाला प्रफुल्लित करणारी होती. ग्रामीण भागात असल्यामुळे वाहनांची गर्दी शहरातल्या सारखी नव्हती. त्यामुळे सर्व वाहने वेगाने चालत होती. पण काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर डोंगर उतारा वळण लागते. वळणाच्या प्रारंभी झरा हे ठिकाण लागते पण या ठिकाणाला आला संस्थेच्या प्रथेप्रमाणे अनन्य साधारण महत्व आहे. हे ठिकाण आहेच तसे. चहूबाजूने डोंगर रांगा जणू काही ही हिरवी शालच पांघरली आहे.
कमालीची शांतता आणि मधेच खळखळणाऱ्या झऱ्याचा लयबद्ध नाद, मोरांची म्यांव म्यांव, कोकिळेची कुहू कूहू , दुरूनच गाई वासरांचा हंबरण्याचा ध्वनी म्हणजेच आवाज आणि या सर्वाना गुराख्याच्या बासरीचा मिलाफ मन प्रफुल्लित करणारे वातावरण या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक प्रवासी झऱ्याच्या ठिकाणी थांबण्याचा मोह टाळता येत नाही. आणि म्हणूनच कि काय या ठिकाणाला श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी च्या प्रथेत अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
इथूनच दरवर्षी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची सुरूवात व भव्य ग्रंथ दिंडीची मिरवणूक निघते यात संस्थेच्या सर्व शाखेचा सहभाग असतो येथून जवळच असलेल्या या गुराखीगडावर दर वर्षी 26 27 28 आणि 29 जानेवारी रोजी हे जागतिक गुराखी साहित्य संमेलन केले जाते. या ठिकाणाहून ग्रंथदिंडी मिरवणुकीने म्हणून यांचे नयनरम्य दृश्य त्याचे पारणे फेडण्याजोगे असते. (क्रमशः)
लेखक – अॅड. गुणाजी मोरे