
दैनिक चालु वार्ता
प्रमोद खिरटकर
कोरपना तालुका – प्रतिनिधी
मदनापूर :-नववर्ष २0२२ चे स्वागत विद्यार्थ्यांनी मोठ्या हर्षाने आनंद मेळाव्याने केले.अंकीता धारणे पल्लवी नन्नावरे पुजा रंदये या विदयार्थ्यानी “नवीन हे वर्ष सुखाचे जावो” या सुंदर गिताने केली.
आनंदमेळावा यशस्वी करण्याकरीता वैष्णवी मेश्राम , वैष्णवी बावणे, पल्लवी नन्नावरे, साक्षी मगरे, वैष्णवी नन्नावरे, स्नेहा झोटींग, मंथन आडे, शोषम ठवरे यांनी सुंदर चविष्ट पदार्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. याप्रसंगी श्री भक्क्तदास जिवतोडे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांनी नविन संकल्प घ्यावे, वाईट सवयी सोडून यशस्वी जिवनास सुरुवात करावी असे मनोगत व्यक्त केले .
श्री.बावणकर, श्री . दांडेकर, श्री . जांभुळे यांनी आपल्या प्रेरणादायी शुभेच्छात्मक मनोगतातून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रोकडे यांनी केले . संचालन शिवाणी गेडाम हिने केल व आभार छकुली चौखे हिने मानले .