
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- तालुक्यातील मोढा फाटा येथे गुरुवारी पहाटे बंद पडलेल्या ट्रॅक्टरला पिकअप टेम्पोची धडक बसली. या अपघातात घाटशेंद्रात लग्न आटोपून मंगरूळला परतणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांना जीव गमवावा लागला. टेम्पोमधील 14 जण गंभीर जखमी झाले. जखमींना औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात आणि सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगरूळ येथील शिवराम मुकुंदा खेलवणे यांचा विवाह घाटशेंद्रा गावात बुधवारी सायंकाळी पार पडला.
लग्नानंतर खेळवणे कुटुंबातील सदस्य एमएच 20 सीटी 2981 क्रमांकाच्या टेम्पोने मंगरूळ गावी परतत होते.पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पिकअप टेम्पो मोढा फाट्यावर आला आला असता, चालक झोपी गेल्याने त्याचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अनोळखी ट्रॅक्टरला धडकला. ट्रॅक्टरला अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर टेम्पोचे तुकडे झाले. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जिजाबाई गणपत खेलवणे(60), संजय खेलवणे(42), संगीता रतन खेलवणे(35), लक्ष्मीबाई अशोक खेलवणे(45) अशोक संपत खेलवणे(52) रंजनाबाई संजय खेलवणे (40)हे सर्व मंगरूळ गावातील रहिवासी आहेत. याशिवाय कासाबाई खेळवणे, अजिनाथ खेळवणे, आकाश बोर्डे, ऋषिकेश आरके, संतोष खेळवणे, धुळाबाई नारायण बोर्डे, दुगाबाई खेळवणे, सुलोचना खेळवणे, गणेश बोर्डे अपघातात गंभीर जखमी झाले.
गंभीर जखमींना औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी सार्थक खेळवणे, ओंकार खेळवणे, कलाबाई मस्के, सुभाष खेळवणे, सुरेश खेळवणे यांना उपचारासाठी सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दुसरीकडे घटनेची माहिती सिल्लोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळताच पीआय सीताराम म्हात्रे, फौजदार विकास आडे, लक्ष्मण कीर्तने, अनंज जोशी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. या घटनेनंतर मंगरूळ गावात शोककळा पसरली आहे.