
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज: बुधवारी सांयकाळी व रात्री पेठवडज सर्कल मधील गावांना पावसाने झोडपले. वादळी वारा आणि पावसामुळे
हरभरा पिकाचे फुल पूर्णपणे गळून गेले आहेत.ऊस आडवा पडला असून गहू, तूर, रब्बीज्वारी हाळद, मीरची भाजीपाला,आंबा, फळबागा बरबाद झाल्या आहेत. गेल्या चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण असून गारपीटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. बुधवारी पेठवडज सर्कल मधील संपुर्ण गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा मोठा फटका बसला. सप्टेंबर- ऑक्टोंबर मध्ये अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला होता. यात खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी रब्बीकडे वळला होता मात्र रब्बीतही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तोंडचा घास लांबवल्याची भावना शेतक-यांनी व्यक्त केली दुसरीकडे नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
पण पेठवडज सर्कल मधील गावांना अजून दुसरा हप्ता मिळाला नाही.तसेच,पीकविमा कंपनीने तर शेतक-यांची थट्टाच केली आहे. प्रिमियम भरला पाच हजार आणि शेतकऱ्यांना भेटले दोन हजार म्हणजे शेतक-यांनी भरतलेले पाच हजार मधून तीन हजार कंपनी ने शेतकऱ्यांचे ठेवून घेतले आहेत आणि आता मौसमी पावसाने पेठवडज सर्कल मधील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांनी शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश दयावेत अशी मागणी पेठवडज सर्कल मधील सर्व शेतक-यांनी केली आहे.