
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
बदनपूर :- बदनपूर तालुका येथील पाडळी गावचे रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य तसेच नामांकित कंपनीत इंजिनिअर असलेले श्री. नागेश शेळके यांनी जिल्हा प्राथमिक शाळा,पाडळी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन आपला वाढदिवस साजरा केला.वाढदिवसाच्या दिवशी शिल्लक वायफळ खर्चला फाटा देत तो खर्च विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी आपण फुल ना फुलाची पाकळीची मदत द्यावी ही कल्पना सुचली आणि उदार अंतकरणाने त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन स्वतःचा वाढदिवस साजरा केला .
नवल म्हणजे हार,केक,असल्या कोणत्याही पद्धतीचा सत्कार न स्वीकारता त्यांनी हा उपक्रम हाती घेऊन हा कार्यक्रम राबवला त्यामुळे त्यांच सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर सिरसाठ यांनी केले तर मनोगत तंटामुक्त अध्यक्ष तातेराव सिरसाट,माजी सरपंच कृष्णा सिरसाट , शालेय समिती अध्यक्ष उद्धव सिरसाट यांनी व्यक्त केलं तर कार्यक्रमाचे आभार शेख सर यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित शाळेतील शिक्षक शेख सर,तंटामुक्ती अध्यक्ष तातेराव सिरसाट,माजी सरपंच कृष्णा सिरसाट,ग्रामपंचायत सदस्य विष्णू सुरते,शालेय समिती अध्यक्ष उद्धव सिरसाट,ग्रामपंचायत ऑपरेटर सिद्धेश्वर शेळके,सुनील सिरसाट,विष्णू पवार,ज्ञानेश्वर सिरसाट,सिताराम सिरसाट,विठ्ठल सातपुते,वसंत सिरसाट,राहुल शेळके,कृष्णा शेळके,दीपक शेळके,बाळासाहेब सिरसाट,माऊली शिवाजी सिरसाट,विजय शेळके,रोहन शेळके,शरद शेळके,प्रदीप सिरसाट व विद्यार्थी इत्यादीची उपस्थित होती .
आंबडगावचे कैलास खेंडके यांचाही समाजसेवी उपक्रम -*
बदनपूर तालुक्यातील आंबडगाव येथील रहिवाशी कैलास खेंडके यांनी वायफळ खर्चाला फाटा देत स्वतःचा वाढदिवस केला विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन साजरा केला .कैलास खेंडके यांनी सकाळी जिल्हा प्राथमिक शाळा,आंबडगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन आपला वाढदिवस साजरा केला.शिल्लक वायफळ खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी आपण फुल ना फुलाची पाकळीची मदत द्यावी ही कल्पना सुचली आणि उदार अंतकरणाने त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन स्वतःचा वाढदिवस साजरा केला. हार,केक,कोणत्याही पद्धतीचा सत्कार न स्वीकारता त्यांनी हा उपक्रम हाती घेऊन हा कार्यक्रम राबवला त्यामुळे त्यांच सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा नियोजन सिद्धेश शेळके यांनी केले तर याप्रसंगी उपस्थित शाळेतील शिक्षक साबळे सर, गणेश जऱ्हाड सर,स्वप्नील जऱ्हाड,गणेश खेंडके,रवी जऱ्हाड, अनिकेत जारे,शरद खेंडके,पृथ्वीराज जऱ्हाड,दीपक विधाते,सुशांत खेंडके,गणेश जऱ्हाड,पप्पू खरात आणखी गावातील मित्र मंडळ व विद्यार्थी इत्यादीची उपस्थित होती .