
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- जिल्ह्यातील नगर परिषद मधील नागरिकांना मुलभूत सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व विकास कामे करण्यासाठी 100%टक्के वसुलीचे उद्दिष्ट साध्य करावे किबंहुना 1ते 15 जानेवारी 2022 पर्यंत मोहीम पंधरवडा राबविण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी काढले होते. या आदेशाची तात्काळ दखल घेऊन लोहा नगरपरिषदेचे मुख्यआधिकारी गंगाधर पेंटे सरांनी आपल्या कर्मचाऱ्यांची मिटिंग घेऊन प्रभाग वाईस चार कर वसूली पथक स्थापन केले असुन प्रत्येक पथकासोबत एक पथक प्रमुख व चार कर्मचारी असे चार पथक तयार करण्यात आले आहे पथक प्रमुख म्हणून चवडेकर श्रीहरी गंगाधर उल्हास रूपला राठोड माधव भाऊराव पवार श्रीमती श्रद्धा दिगंबर पांचाळ शेषराव निवृत्ती भिसे ज्ञानेश्वर संभाजी जाधव यांची पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे .
प्रत्येकासोबत चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे प्रत्येक पथक प्रमुखाला प्रभाग वाईस विभाग वाटून देण्यात आले आहेत पथक प्रमुखाला सकाळी आठ वाजता प्रत्येक प्रभागात नळपट्टी व मालमत्ताधारकांना सकाळी जाऊन भेटणे कनेक्शन चालू आहे बंद आहे ते पाहून नळ कनेक्शन कट करणे मालमत्ता धारकाची कर भरून घेणे रोजच्या रोज सायंकाळी कार्यालयात अहवाल सादर करणे असे स्पष्ट आदेश मुख्य अधिकारी श्री गंगाधर पेंटे यांनी दिले आहेत. तसेच थकीत वसुलीबाबत थकबाकीदारांना नोटीस देऊन कर भरणा करण्यास सूचना द्याव्यात जास्त बाकी दार यांची मालमत्ता यादी प्रसिद्ध करण्यात यावी जर मालमत्ताधारकांनी विविध कालावधीत आपली थकबाकी न भरल्यास महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 149 ते 156 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे सक्त आदेश मुख्याधिकारी गंगाधर पेंट यांनी दिली आहे. याची कडक अंमलबजावणी करावी असेही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आदेशित केले आहे या कामासाठीच नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी व त्याची सर्व टिम भक्कम पने मुख्याधिकारी साहेबा सोबत आहे.