
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी
संतोष मंनधरणे
देगलूर :- तालुक्यातील येरगी येथे 3 जानेवारी रोजी संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी शस्त्रक्रिया,अपेंडीक्स, हर्निया,हायड्रोसिल शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे हे चौथे वर्ष असून मागील तीन शिबिरात शेकडो रुग्णांचे रोगनिदान करून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले आहेत. सदरील शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन माजी आमदार सुभाष साबणे हे करणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे राहणार आहेत तर भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,भाजप नेते रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी शक्ती कदम,डीवायएसपी सचिन सांगळे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिवशंकर वलांडे,जिल्हा परिषद सदस्य विक्रम साबणे, भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव कनकंटे,डॉ.विनायक मुंडे, डॉ.उदय पाटील,डॉ.किरण ठाकरे,उदयगिरी लायन्स नेत्रालय उदगीर चे डॉ.लखोटीया व त्यांची टीम उपस्थित राहणार आहेत. तरी सदरील रोगनिदान शिबीर व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संतोष पाटील मित्रमंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे.