
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
हदगाव :- हदगाव तालुक्यातील मौजे कोळी येथे मनाठा युवक कांग्रेस सर्कल प्रमुख तथा कोळी येथिल तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर यांच्यावतीने आगामी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख पाटील यांचे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हवामान व हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन मेळावा मंगळवार दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता हनुमान मंदिर कोळी येथिल प्रांगणात भव्य शेतकरी मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले असल्याची व या कार्यक्रमाला हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हिंगोली लोकसभेचे माजी खासदार व स्टार प्रचारक सुभाषराव वानखेडे व अन्य मान्यवर उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल पवार करमोडीकर व मनाठा युवक कांग्रेस चे विभाग प्रमुख तथा कोळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना सोशल मीडियाद्वारे हवामान अंदाज सांगून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणारे, निसर्गाच्या संभाव्य धोक्यापासून शेतकऱ्यांना अचूक माहिती देणारे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डक यांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे,परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घेऊन रब्बी हंगामात हरभरा पिकाचे उत्पादन वाढवावे,रब्बी हंगामात हवामान जाणून घाव्ये, या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी बांधवांनी जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिसरातील शेतकरी बांधवांना मनाठा युवक काँग्रेसचे सर्कल प्रमुख तथा कोळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल पवार करमोडीकर यांनी केले आहे.