
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदीप मोरे
नंदुरबार :-15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीतून भारत मुक्त होऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून “अमृत महोत्सवी भारत” हा उपक्रम महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. म्हणून “अमृत महोत्सवी भारत” उपक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांचे उपस्थितीत ” अमृत महोत्सवी भारत” या उपक्रमाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम शिवाजी चौक नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला होता.
कोरणा नियमांचे पालन करून नवीन वर्षानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस बँड पथकातील पोलिसांनी बँड वाजविण्याचा कार्यक्रम करून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री डी आर पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांचे प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरात बँड पथकाचा संचलन करण्यात आले. सदरचा कार्यक्रम योग्य ती परवानगी घेऊनच आयोजित करण्यात आला होता.”अमृत महोत्सवी भारत” या उपक्रमाचे औचित्य साधून नवीन वर्षाच्या शुभेच्छा सहा चारशे नागरिकांना पोलिसांतर्फे मास्क देखील वाटप करण्यात आले तसेच नागरिकांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे महत्त्व सांगून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एक वेळा झपाट्याने वाढत असून काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विजय पवार विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री सचिन हिरे नंदुरबार तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार खेडकर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र भदाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र भावसार इतर अधिकारी अंमलदार व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.