
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्री पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर जनतेसाठीच नव्हे तर पोलिस दलातील अंमलदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून अत्यंत कमी वेळेत जनतेच्या आणि नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्षानुवर्षे पोलिस दलात परिश्रम करून पोलीस अंमलदार आपल्या पदोन्नतीची वाट पाहत असतात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांनी पदोन्नती देणाऱ्या संबंधित शाखेचे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नंदुरबार जिल्ह्यातील सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अंमलदारांना पदोन्नती देणे बाबत सूचना दिलेल्या होत्या त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून नववर्षाच्या पूर्वसंध्येला 34 पोलिस हवालदारांना सहा. पोलीस उपनिरीक्षक ( A.S.I) पदावर पदोन्नती देण्यात आली.
नववर्षाच्या बंदोबस्तात सर्व अधिकारी व अंमलदार व्यस्त असताना पोलिस हवालदारांना अचानक संध्याकाळी अशी पदोन्नती झाल्याची बातमी मिळाल्याने पोलीस आमदारांचा आनंद द्विगुणित होऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील एकूण 34 पोलिस हवालदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार सहा पोलीस निरीक्षक पदोन्नती देऊन नववर्षाची भेट दिलेली आहे.
पोलिस दलात सुमारे 30 ते 35 वर्षे अथक परिश्रम घेऊन सेवा करणार्या अंमलदारांच्या सहा. पोलीस उपनिरीक्षक हा पदोन्नतीचा जवळजवळ शेवटचा टप्पा असतो त्यानंतर बहुतेक अंमलदार हे पोलीस दलातून सेवानिवृत्ती होत असतात. पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील यांनी 34 पोलिस हवालदारांना सहा पोलीस उपनिरीक्षक (A.S.I.) या पदावर पदोन्नती दिल्यामुळे पोलीस हवालदार यांना पोलीस दलात बजावलेली सेवा सफल झाल्यासारखे वाटते. पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी.आर. पाटील यांनी पदोन्नती बाबत अभिनंदन करून नववर्षाच्या व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पदोन्नती झालेले आमदारांची नावे खालील प्रमाणे.
१)पितांबर रतन पाडवी २)राजू जयसिंग जाधव३) लक्ष्मण गजमल कोळी ४) मुंगज्या जत्र्या पाडवी ५)हर्षल पंडित रोकडे ६) वीरसिंग बापू वळवी ७) गिरधन महारू सोनवणे ८)पानाजी पत्तू वसावे ९)फुलसिंग मांजऱ्या पटले १०)मुकेश रधिया गावित ११) मोहनलाल रेवजी वळवी १२) विठ्ठल भिका पावरा १३) राजेंद्र शंकर दाभाडे १४) राजेश सखाराम ठाकरे १५) राजेंद्र निळकंठ चव्हाण १६) सुपडू रुपसिंग पाडवी १७)गिरीधर भिका माळीच १८)नरेंद्र करण सिंग वळवी १९)सुकलाल जतन भिल २०)राजू देवसिंग पारोळेकर २१) वंतू भिकाऱ्या गावित २२) युवराज पानसिंग रावताळे २३) फारुखबेग मोगलबेग मिर्झा २४)गणेश भिकाजी वसावे २५) कृष्णा पौलाद पवार २६)वासुदेव प्रतापसिंग गोसावी २७) सादिक शफीक शेख २८) प्रदीप सिंग देवनाथ सिंग राजपूत २९) संजय भिमराव मराठी ३०) दीपक नामदेव पाटील ३१) संजय चिंधु पाटील ३२)रवींद्र रमेश पवार ३३)विकास पिरण पवार ३४) मुरारजी आलू वळवी