
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना :- अंतरगाव ईथे नवयूवक बुद्ध मंडळ व संघमित्र महिला मंडळ यांच्या वतीने वर्धापनदिन व ध्वजारोहण करण्यात आला शोर्याचे प्रतिक माणल्या जाणार्या पूणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथिल ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी एक जानेवारी शोर्य दिनाच्या निमित्ताने अंतरगाव नवयूवक बुद्ध विहार इथे मानवंदना देण्यात आली व ध्वजारोहण करण्यात आला, तसेच कोरेगाव भीमा शोर्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला, कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे,
हि लढाई एक जानेवारी इ, स, १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यांत झाली होती, या लढाईमध्ये ८३४ ब्रिटिश सैनिक तर २८००० मराठा सैनिक होते या लढाईमध्ये शहिद झालेल्या सैनिकांची ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजय स्तंभ उभारून त्यावर २० शहिद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत, महार सैनिकांच्या स्मरणार्थ तेथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी तसेच बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा समोर ठेवून बुद्ध वंदना घेऊन शहिद सैनिकांना मानवंदना दिली जाते,
तसेच नवयूवक बुद्ध विहार यांच्या वतीने अंतरगाव इथे एक जानेवारी ते तीन जानेवारी पर्यंत इथे कार्यक्रम घेण्यात येतो. एक जानेवारी कोरेगाव भीमा शोर्य दिवस म्हणून साजरा केला जातो, दोन जानेवारी वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो आणि तिन जानेवारी शहिद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी रॅली काढण्यात येते, या कार्यक्रमासाठी अंतरगाव येथिल उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते