
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
कळमनुरी :-येथील शासकीय विश्रामगृहावर ओबीसी संघर्ष समितीची आज दि.१ जानेवारी 2022 शनिवार रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आ.रामरावजी वडकुते,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषदादा बांगर, माजी आ.गजाननराव घुगे,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नागोराव जांबुतकर हे उपस्थित होते.
दि.2४ जानेवारी 2022 सोमवारी रोजी कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींना 2७% राजकीय आरक्षण पुर्ववत कायम होई पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेण्यात येवू नये,ओबीसी जनगणना करावी, राज्य मागासवर्गीय आयोगाला 500 कोटी रुपये निधी देवून इम्पिरेकल डेटा तयार करुन 3 महिन्यात सुप्रीम कोर्टात दाखल करावा या मागण्यासाठी ओबीसी एल्गार आरक्षण मोर्चा काढण्याचे एकमताने ठरले.
या बैठकीचे प्रस्ताविक ओबीसी संघर्ष समिती अध्यक्ष ॲड.रवी शिंदे यांनी तर सुत्रसंचलन विठ्ठल गाभणे व आभारप्रदर्शन उमेश गोरे यांनी केले. या बैठकीस माजी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे,उत्तमराव राठोड,राजेंद्र शिखरे,डॉ.प्रकाश नाईक ,मारोतराव खांडेकर,अशोक करे,बाळासाहेब नाईक ,प्रा.गजानन आसोलेकर,ॲड .राजेश नाईक ,ॲड इलियास नाईक ,दिलीप नरहरे,बाळासाहेब वायकोळे,आप्पाराव शिंदे,कानबाराव शिंदे पुयनेकर,शरद सुरोसे,अतुल बुर्से,फारुख बागवान,अतुल वाघमारे ,शिवराज पाटील ,गजानन शिंदे,सतीश तांबारे,साहेबराव मस्के,पिंटु गडदे,गणेश बेनगर, डॉ.देवराव गोरे,रामराव मस्के शेनोडीकर ,दामोधर घुगे,विलास मस्के नाईक ,शिवम नाईक ,राजू संगेकर,संभाजी सोनुने, पत्रकार संजय कापसे,राहूल मेने,संजय शितळे,शंकर मुलगीर,गजानन कापसे, ॲड, प्रभाकर मोरे,राजु बाभळे,दयानंद चट्टे,फकिरराव जांबूतकर ,दत्ता गोरे,भास्करराव ढाले,पुंजाराव वाघमारे ,दिनाजी क्षीरसागर यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.