
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना तालूका :- आवाळपूर दूधडेअरी इथे विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले आवाळपूर ग्रामपंचायत इथे विविध विकास कामे करण्यात येत आहे, आवाळपूर गावची महिला सरपंच प्रियंका ताई दिवे यांच्या पूढाकाराने आवाळपूर गावाला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहे. कोरोना पाक्ष्वभूमीवर अनेक विकास कामे सुरू करता आले नाही त्यामुळे कामे प्रलंबित आहेत नविन वर्षाच्या पूर्णसिध्येला मोठ्या प्रमाणात कामे सुरू केली आहे. यावेळी आपल्या भागात सुरू असणाऱ्या विकास कामांचा दर्जा चांगला राहावा यासाठी प्रत्येक नागरीकांनी सहकार्य करावे कामे दर्जेदार होतील यांची काळजी घ्यावी.
आपल्या घरच्या कामाप्रमाने या कामाकडे लक्ष द्यावे असे आवाहन सरपंच मॅडम यांनी केले. गावात विकास कामे होण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची आहे. गावांच्या सर्वाधिक विकासासाठी गटागटाने राजकारण बाजूला ठेवून एक दिलाने कामे केल्याने गावाचा विकास घडतो, असे व्यक्तव्य आवाळपूर ग्रामपंचायत चे उपसरपंच बाळकृष्ण काकळे यांनी केले, विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते, विकास कामांचा शुभारंभ आवाळपूर ( दूधडेअरी ) गावचे जेष्ठ नागरिक संभाजी पानघाटे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आवाळपूर गावची सरपंच प्रियंकाताई दिवे उपसरपंच बाळकृष्ण काकळे ग्रामपंचायत सदस्य बिंटू भाऊ दिवे, विकास भाऊ दिवे, ग्रामपंचायत सदस्य सूषमीता पानघाटे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक अशोकजी पेटकर, विठ्ठल थेरे, भिमपाल निमगडे आदी उपस्थित होते