
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि वडेपुरी
मारोती कदम
लोहा :- लोहा पंचायत समितीचे विद्यमान सभापती आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर तालुक्यात कार्यसम्राट सभापती म्हणून ओळखले जातात केवळ ते बोलतच नाहीत तर कृती प्रमाणे कार्य करतात .अतिशय मनमिळावू ,समजदार, आणि सर्वांना सांभाळून घेणार असं व्यक्तिमत्व म्हणजे आनंदराव पाटील शिंदे, सभापतींचा आज वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा झाला .ढाकणी गावचे सुपुत्र असणारे शेतकरी कुटुंबातील एक उमदे नेतृत्व आणि ह्यांनी सरपंचपदापासून ते सभापती पदापर्यंत मजल मारलेली आहे लोहा तालुक्यातच नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचे अत्यंत विश्वासू असे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे अनेक ठिकाणी सभापती साहेबांचे वाढदिवस साजरे करण्यात आले त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक गावातून शुभेच्छा प्राप्त झाल्या.
सभापती साहेबांचा वाढदिवसानिमित्त पं.स.लोहा उपसभापती नरेंद्र गायकवाड साहेब, केशवराव मुकदम साहेब ,आंबेसांगवी चे उपसरपंच विक्रम कदम सर ,माजी उपसभापती लक्ष्मणबोडके सर, खरबिकर उद्धव पाटील ,दिनेश तेलंग सर, लव्हराळ सरपंच बाजीराव पाटील कदम ,दापशेड सरपंच वीरभद्र राजुरे ,आदी मंडळीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या आनंदराव पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव येत आहेत सभापती सभापती साहेबांचा यथोचित सत्कार या सर्व मंडळींनी केला. चिखलीकर साहेबांचे एक विश्वासू कार्यकर्ते तथा एक युवा नेतृत्व ग्रामीण भागातून उदयास येताना आपणास दिसून येते सभापती साहेबांची अशीच प्रगती व्हावी अशी सगळीकडे या शुभेच्छातून भावना व्यक्त होताना दिसून येते .