
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
शेंबा :- 1 महाराष्ट्र शासनाने तळागाळापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी विविध योजनांची निर्मिती केली असून दलित वस्ती सुधार योजना ही राज्य शासनाचे महा योजना आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची वस्ती असलेल्या ठिकाणी विकास कामे होण्यासाठी ही सामुहिक स्वरूपाची दलित वस्ती सुधार योजना शासकीय महायोजना आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत (अ.जा. नव बौद्ध घटकांचा विकास करण्यासाठी) शेंबा ग्रामपंचायत वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वार्ड क्रमांक 1 येथे तीन हायमास्ट पोल बसवण्यात आले.
त्याप्रसंगी शेंबा ग्रामपंचायत सरपंच. ॲड. नंदकिशोर खोंदले, उपसरपंच. जगन्नाथ भोपळे, सदस्य प्रवीण भिडे, सुरेंद्र चौधरी, कैलास सुशिर,तसेच ग्रामस्थ भारत भिडे,निलेश भि.भिडे, करन भिडे,विजय इंगळे,मंगेश भिडे, विशाल भिडे,पंकज दाभाडे, इच्छाराम भिडे, महिला वंदना भिडे,वंदना अंभोरे, ताईबाई भिडे, शिलाबाई भिडे इत्यादी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.