
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :- दि २३ नोव्हेंबर २०१९ साली मा.सभापती स्व संभाजी पाटील डोंणगावकर यांच्या पुढाकाराने लासुर स्टेशन बाजार समितीसाठी पेट्रोल पंपाची मंजुरी मिळाली होती त्यांनंतर मोठ्या उत्साहात पेट्रोल पंपांचे उद्घाटन झाले होते. लासुर स्टेशन परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा तसेच बाजार समितीच्या उत्पन्नात भर घालणार्या ऐतिहासिक निर्णय घेणारे स्व संभाजी पाटील डोंणगावकर यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर संचालक मंडळाने एकमताने पेट्रोल पंपाला स्व संभाजी पाटील डोंणगावकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता तसे ठराव घेण्यात आल्याच्या बातम्या सुद्धा प्रसारित करण्यात आल्या होत्या.
मा.सभापती स्व संभाजी पाटील डोंणगावकर यांचे निधन होऊन एक वर्ष उलटले तरी पण पेट्रोल पंपाचे नामकरणाचे तसे फलक का लावण्यात आलेले नाही हि बाब शेतकरी नेते इंजी महेशभाई गुजर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दि ७ डिसेंबर २०२१ रोजी सभापती, उपसभापती व सचिव यांना निवेदनाद्वारे ३१ डिसेंबर २०२१ पुर्वी पेट्रोल पंपाचे नामकरण तसेच विविध ठिकाणी फलक लावण्यात यावे तसे न झाल्यास सभापती उपसभापती तसेच सचिव यांच्या खुर्च्यांची मिरवणूक काढुन पेट्रोल पंप परिसरात जाळण्यात येईल असे निवेदन इंजी महेशभाई गुजर दिगंबर गोटे पाटील , ज्ञानेश्वर वर्णे ,पंकज नन्नवरे ,राजु सोमासे, कैलास सोमासे, भाऊसाहेब नेमाने यांनी दिले होते.
परंतु निवेदनाला उत्तर देताना सभापती व सचिव यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित पेट्रोल पंप हा हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ली यांना ३० वर्षाच्या लिजडीड कराराने जागा देण्यात आली आहे. सदर जागे पासुन बाजार समितीस हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी कडुन वार्षिक लिज रक्कम भाडे घेऊन सदरील पंप हा बाजार समितीस कमिशन वर चालवण्यासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे पंपाचे संपुर्ण नियंत्रण व अधिकार हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ली विभागीय कार्यालय औरंगाबाद यांच्या कडे आहेत.
त्यामुळे पेट्रोल पंपाला स्व संभाजी पाटील डोंणगावकर नामकरण करणे शक्य नाही असे दि ९ डिसेंबर २०२१ रोजी इंजी महेशभाई गुजर यांना दिलेल्या पञावरुन निदर्शनास येते आहे. त्यामुळे ज्या संभाजी पाटीलांनी लासुरस्टेशन बाजार समिती नफ्यात आणली. दिवशी पिंपळगाव व गवळीशिवरा येथे उप बाजार समिती मंजूर करून घेतल्या तसेच कांदा मार्केट मध्ये शेतकर्यांना जास्तीचा भाव देण्यासाठी प्रयत्न केले अशा कृतीशिल मा. सभापती चे नाव पेट्रोल पंपाला देण्यास सभापती व संचालक मंडळ उदासिन असल्या बाबत बाजार समिती कार्यातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.