
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माळाकोळी
गणेश वाघमारे
माळेगाव :- श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा माळेगाव आजपासून पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. यात्रेला सुरुवात झालेली आहे, दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेली ही यात्रा आज दुपारी दोन वाजता खंडोबा देवाचे पालखी दरवर्षीच्या मार्गाने निघाली असता यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, मानकरी सर्व भोई समाज धनगर धोंडीबा, माळेगाव नगरीचे विद्यमान सरपंच हनुमंत धुळगंडे सर,ग्रामपंचायत ट्रस्ट अध्यक्ष दयानंद पाटील, पुजारी मल्हारी पताका घेतलेली माऊली लोखंडे ,श्री संत बाळूमामा ट्रस्ट अध्यक्ष धुळगंडे, तसेच युवा मल्हार सेना जिल्हाध्यक्ष नांदेड प्रा अंतेश्वर राधाकिशन सर, शिवाजी नंदाने व परिसरातील सर्व गावकरी लआडगा लिंबोटी ,माळाकोळी लोहा कंधार परिसरातून अनेक भाविक भक्तांनी गर्दी केलेली दिसून येते व अनेक मान्यवर मंडळींच्या देखील या कार्यक्रमाला आगमन झाले होते