
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माळाकोळी
गणेश वाघमारे
आंबे सांगवी :-आंबे सांगवी नगरीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये ज्ञानेश्वरी चे सात दिवस पारायण झाले आणि त्या पारायणाची सांगता आज ग्रंथाच्या मिरवणुकीच्या रुपाने सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन लहान थोर मंडळी ने अतिशय जल्लोष यामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक टाळमृदंगाच्या घोषात ज्ञानोबा माऊलीच्या गजरात गावच्या मुख्य रस्त्यावरून निघाली होती. यामध्ये महिला मंडळींनी प्रत्येक घरापुढे पारायणकर्ते मंडळींचे स्वागत करून त्यांचा यथोचित सन्मान केला. भजनी मंडळ यांनी अभंग गायले तर लहान मुला-मुलींनी फुगडी हा जुना खेळ देवाच्या समोर मांडला. तसेच तरुण मंडळींनी ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत ग्रंथ हेच गुरु आहेत.
मनुष्याला ग्रंथाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि आपली भारतीय संस्कृती ग्रंथाला मानते त्या ग्रंथांतून व्यावहारिक ज्ञान देखील आपल्याला मिळते असा मौलिक संदेश ह भ प व्यंकट महाराज यांनी त्यांच्या कीर्तनातून युवक वर्गाला दिला. एकंदरीत गावातील ज्येष्ठ हभप रुद्रप्पा महाराज यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीस ते पस्तीस वर्षे हा सोपान काका समाधी सोहळा लोहा तालुक्यातील आंबेसांगवी गावा मध्ये चालत असतो आणि ही परंपरा अशीच टिकून राहावे यासाठी गावकरी सदोदित प्रयत्न करत असतात. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन प्रवचन कीर्तन महाप्रसाद असा हा नयनरम्य सोहळा आज दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी नवीन वर्षाचे स्वागत असाच योग म्हणावा लागेल. गावामध्ये अतिशय भक्तीमय आणि आनंदमय वातावरण या कार्यक्रमातून दिसून आले.