
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- गीतकार डॉ. रामदास गवळी यांच्या हिंदी गीतांवर आधारित स्वरवेदिका म्युझिकल ग्रुपचे गायक अजय पाटील यांनी तयार केलेल्या दिल में कोई रहता है या अल्बमचे चित्रीकरण नुकतेच कुबेर गेवराई येथे पार पडले. १९९० च्या दशकातील मेलडी गीतांची आठवण करून देणारे युगुलगीत अजय पाटील व परतूरच्या प्रज्ञा बंड यांनी गायिले आहे. कथालेखन मयूर कुबेर यांचे असून, संगीताची धुरा अजय- अरविंद यांनी सांभाळली आहे.,या अल्बम मध्ये परतुरच्या प्रिया बंड आणि आदी कुबेर हे मूख्यभुमिके मध्ये दिसणार आहेत.