
दैनिक चालु वार्ता
कंधार-लोहा विशेष प्रतिनिधी
ओंकार लव्हेकर
कंधार :- कंधार येथे आज दैनिक चालू वार्ताचे कार्यकारी संपादक आदरणीय रामेश्वर लोखंडे पाटील यांनी ओंकार लव्हेकर यांच्या अनुराग विमा सेवा केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांचा नांदेड जिल्हा प्रतिनिधी विश्वास खांडेकर,ओंकार लव्हेकर व माधव गोटमवाड यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी रामेश्वर लोखंडे पाटील सर यांनी सांगितले, आज आपला दैनिक चालू वार्ता हा समाजात रुजत आहे.
आपल्याला सर्व सामान्य व्यक्तीची समस्या सुटतील अश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या पाहिजेत.दैनिक चालू वार्ता हा आपल्या प्रत्येकाचा आहे.त्यांनी आपल्या प्रतिनिधी यांना मोलाचा सल्ला दिला.व आपल्या प्रतिनिधी सोबत आपला दैनिक चालू वार्ता सोबत आहे पण काम हे प्रामाणिक प्रमाणे करावे असा मोलाचा सल्ला ही दिला.