
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत आज म्हणजेच ३ जानेवारीपासून १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होत असून औरंगाबाद शहरात एकूण ६ केंद्रांवर ही लस दिली जाईल..
कोविन ॲप प्रमाणेच लसीकरण केंद्रांवर सुद्धा होणार नोंदणी
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी प्रमाणेच लसीकरण केंद्रावर सुद्धा नोंदणी करून लस दिली जाईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
येथे होणार औरंगाबाद मधील मुलांचे लसीकरण..
● क्रांती चौक आरोग्य केंद्र,
● राज नगर आरोग्य केंद्र,
● एमआयटी हॉस्पिटल, सिडको- एन-4 अंबिकानगर आरोग्य केंद्र
● मेल्ट्रॉन हॉस्पिटल, एमआयडीसी चिकलठाणा,
● प्रियदर्शनी विद्यालय, मयुरबन कॉलनी,
● एस. बी. ओ. ए. पब्लिक स्कूल, हडको एन -११ जळगाव रोड.
लसीकरणाची वेळ सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत..