
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कुमारी-लावण्या रवी तरे वय – 14, राहणार- आशेळेगाव (अंबरनाथ) लावण्याचा तरे हिला 4 ते 5 महिनापासून थायरॉइडचा प्रॉब्लेम झाला. त्यांनी जवळच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये त्या थायरॉईडचे काठीची तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करायला सुचवले. परंतु लावण्या तरे तिचे वडील रिक्षाचालक असल्याकारणाने प्रायव्हेट हॉस्पिटल चा खर्च त्यांना परवडत नव्हता. खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दोन ते अडीच लाख रुपये खर्च येणार असे सांगण्यात आले. त्यांनी भरपूर ठिकाणी पैसे साठी प्रयत्न केले पण कुठून हि त्यांना मदत मिळाली नाही.
एक वेळेस लावण्या तरे तिच्या वडिलांनी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे संपर्कप्रमुख श्री संजय तरे यांना संपर्क केला. श्री संजय तरे यांनी तात्काळ त्यांच्याकडून सर्व रिपोर्ट मागून घेतले. रिपोर्ट घेऊन संजय तरे यांनी आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांची भेट घेतली. श्री जितेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना जाण्यास सांगितले. लावण्या हिला घेऊन नवीमुंबई येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी तपासणी केली.
डॉक्टरांनी थायरॉईड ची गाठ चेक करून हॉस्पिटल मध्ये त्यांना ऍडमिट होण्याचा सल्ला दिला. हॉस्पिटल मध्ये तिचे काही रिपोर्ट करून घेतले आणि तीन-चार दिवसांमध्ये तिचे ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झाले. लावण्या तरे हिला सात ते आठ दिवस ठेऊन सुट्टी करण्यात आली. लावण्या तरे हिला हॉस्पिटल मध्ये कुठला ही खर्च न करता सर्व मोफत मध्ये करण्यात आले. लावण्या रवी तरे तिच्या सर्व कुटुंबीयांनी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे श्री संजय तरे व श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले.