
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ते कांता राठोड यांची आशेरमुख फाऊंडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे फाऊंडेशनने एका प्रसिद्ध पत्राद्वारे जाहीर केले आहे. दरम्यान कांता राठोड हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजीक कार्यात अग्रगण्य भूमिका बजावत आहेत. निराधारांना आधार देऊन खऱ्या अर्थाने माणुसकी धर्म काय? असतो याची शिकवण देणारे कांता राठोड हे समाज कार्यात सातत्याने आपली भूमिका बजावत असतात म्हणुन कांता राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन,आशेरमुख फाउंडेशनने त्यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान कांता राठोड हे पुणे जिल्हा उपाध्यक्ष माहिती अधिकार पोलिस मित्र पत्रकार संरक्षण सेना, शिवसंग्राम परिषद कोरोना योद्धा पुरस्कार, महाराष्ट्र समविचारी मंच सदस्य, नेताजी काॅग्रेस सेना पुणे जिल्हाध्यक्ष (जिएनटी)सेल,आशा विविध सामाजिक संघटनेवर कांता राठोड हे काम करत आहेत.पुणे जिल्हा परीसरात त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहेत.दरम्यान त्यांच्या नियुक्तीचे स्वागत शिव संग्राम पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, जेष्ठ पत्रकार सतिष राठोड, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड, यांनी केले आहे.