
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी बनविलेल्या दिनदर्शिकीचे विमोचन संभाजीनगर शहरातील (पश्चिम) चे आमदार तथा लोकप्रिय नेते संजय शिरसाठ साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी सर्व राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या यशस्वी शुभेच्छा दिल्या. तसेच दिनदर्शिकेच्या उत्तम सादरी करणा बाबत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे कौतुक केले.
तसेच येणाऱ्या नवीन वर्षात हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व महाराष्ट्राचे लाङके मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेणे आपल्या हातून सदैव अशीच जनसेवा घङावी, अशा यशस्वी शुभेच्छा उपमहापौर राजेंद्र जंजाळ व राजेंद्र जंजाळ मिञमंङळ तसेच उपस्थित शिवसेना – युवासेना च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आकाश राऊत, ज्योतीराम पाटील, संतोष खोंडकर, सुरज शिंदे, नरेश लोखंडे, सागर मोगल, व्यंकटेश शिंदे व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.