
दैनिक चालु वार्ता
तालुका आर्णी प्रतिनिधी
रमेश राठोड
आर्णी :-तालुक्यातील सावळी सावळी येथे दि.२/१/२०२२ रविवारी सकाळीआरोग्य शिबिराचा एक हजाराच्या वर रुग्णांनी घेतला लाभ. आरोग्य शिबिरात एक हजार रुग्णांची तपासणी यवतमाळच्या नामवंत व तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती. तपासणी व औषधोपचार मोफत.
सावळी सदोबा ( वार्ता ) :-
शहीद ज्ञानेश्वर आडे बहुउद्देशीय संस्था, कृष्णनगर यांच्यावतीने दि.2 जानेवारी रविवार रोजी सावळी सदोबा येथे भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सावळी सदोबा व परिसरातील गावातील एक हजाराच्या वर रुग्णांनी हजेरी लावली होती. यवतमाळच्या नामवंत व तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी केली. आयोजकांकडून रुग्णांच्या तपासणी सोबतच मोफत औषधोपचार आणि ठेवण्यात आले होते हे विशेष.
सावळी सदोबा येथील तंवर कॉंम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात यवतमाळ चे प्रसिद्ध दातांचे डॉ.प्रशांत तामगाडगे, आर्थोपेडिक सर्जन डॉ.वरून डहाके, डॉ. अजोनिश कांबळे ,डॉ.अच्युत नरूटे, जनरल सर्जन डॉ.सुमेध गुर्दे यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी करून उपचार केले. सावळी सदोबा सर्कलच्या इतिहासात अशा भव्य प्रमाणावर रोगनिदान शिबिरात तपासणी व औषधोपचार संपूर्णपणे मोफत करण्याची ही पहिलीच वेळ होती.
या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांचे रक्त तपासणी व शुगर तपासणी मोफत करण्यात आली. या शिबिरात मास , सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग या कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली होती. या शिबिराला पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांनी भेट देऊन स्वतः तपासणी करून घेतली. या शिबिरात तपासणी करून औषधोपचार घेतलेल्या रुग्णांनी या शिबिराचे आयोजक वीरपत्नी कुंतीताई आडे , नुनेश्वर आडे व मुबारक तंवर यांचे आभार मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी किसन चव्हाण राम पवार माळेगांव, जितेश पवार, ईंद्रसिंग चव्हाण, विजय राठोड, सनम तवर, उमाकांत आडे, राज चव्हाण,अमोल जाधव, संदेश तोव्हर, विरू राठोड,चेतन चव्हाण, नानु राठोड, लखन राठोड, टिनु चव्हाण, संतोष पवार, अमित जाधव, ऊल्हास जाधव, डोमा चव्हाण, माॅंटी जाधव, सत्पुरुष चव्हाण, मनमोहन जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.