
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
नांदेड :- २ जानेवारी २०२२ रोज रविवारी ११.०० वाजता राष्ट्रिय समाज पक्षाचे शिबिर अतिथी हाॅटेल नाना नानी पार्क समोर शिवाजी नगर नांदेड येथे पार पडले, असून या बैठकिला मार्गदर्शन करताना राष्ट्रिय अध्यक्ष राष्ट्रनायक मा.महादेवजी जानकर साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले राष्ट्रिय समाज पक्ष राष्ट्रिय पातळीवर सतरा राज्यात पोहचला असुन चार राज्यांत राज मान्यता मिळाली आहे.येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर कामाला लागावे.
उतर प्रदेशात विधानसभेत ४०३ उमेदवार उभे करणार आहोत असे प्रतिपादन राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांनी केले. तसेच राष्ट्रिय संघटक व आंध्रप्रदेश, तेलंगना, कर्नाटक प्रभारी गोविंदराम शूरनर म्हणाले, पक्षाचे कार्यकर्त्यांनी “सक्रिय कार्यकर्ता ” अभियान गावपातळी पर्यंत राबवून सर्व समाजाला अभियानात सोबत घ्यावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रभारी प्रा. शिवाजीराव इंदूरे, ॲड.चंद्रभागाताई काळे, शांतीलाल जैन, नागनाथ कोकणे(रासप,तालुका अध्यक्ष देगलूर) प्रा.बालाजी नाईक, नितिन सापनर, यांनी केले.